पूर्वा गावडे हिने जलतरणपटू म्हणून राष्ट्रीय पातळीवर दाखवलेली चमक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी!

पूर्वा गावडे हिने जलतरणपटू म्हणून राष्ट्रीय पातळीवर दाखवलेली चमक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी!

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या पत्रकार संदीप गावडे यांच्या कन्या कु. पूर्वा गावडे हिने जलतरण क्षेत्रात निर्माण केलेले यश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.

प्रसाद पाताडे, सिंधुदुर्ग; राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या पत्रकार संदीप गावडे यांच्या कन्या कु. पूर्वा गावडे हिने जलतरण क्षेत्रात निर्माण केलेले यश जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. पुणे बालेवाडी येथे निवड झाल्यानंतर एक नामांकित जलतरणपटू म्हणून दाखवलेली चमक कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सोमवारी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर याने काढले. सोमवारी ती जिल्ह्यात आली होती. त्यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी तिची भेट घेत खास अभिनंदन केले.

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्यासह परिषद प्रतिनिधी गणेश जेठे सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, बाळ खडपकर, सह सचिव प्रकाश काळे, कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, महेश सरनाईक, राजन नाईक, महेश रावराणे, प्रमोद महाडगुत, संदीप गावडे व रश्मी गावडे या सर्वांच्या उपस्थितीत कु. पूर्वा चे अभिनंदन करण्यात आले व तिला शुभेच्छा देण्यात आल्या.

सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्या नंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही 17 वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले आहे. तीची आता राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी -ओरोस येथील पूर्वा गावडे ही सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असून तिथेच दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. पूर्वा हिने अलीकडेच ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते तर गुजरात मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया ज्युनियर जलतरण क्रीडा स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते. तसेच महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती. त्यानंतर आता राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही सातत्य राखत यश मिळविले आहे. जिल्हा पत्रकार संघाने कौतुक केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप; Video Viral
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com