जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, समर्थकांकडून धमकी देणाऱ्याला चोप; Video Viral

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आली.

मागील दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचा थेट अंडरवल्ड सोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर एक ऑडिओ क्लिप सध्या समोर येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या महेश आहेर याला आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोप दिला आहे. महेश आहेर हा ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्त असून आव्हाड कुटुंबीयांना संपवण्यासाठी त्यानं तिहार जेलमधील गँगस्टर सुभाषसिंह ठाकूर ऊर्फ बाबाजीला सुपारी दिल्याची कबुली देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर पोलिसांनी आहेरला ताब्यात घेतलं. मात्र आव्हाडांच्या संतापलेल्या कार्यकर्त्यांनी त्याला पोलीस स्टेशनबाहेर चांगलाच चोप दिला. तर आव्हाडांकडून महेश आहेर यांची ऑडियो क्लिप व्हायरल झाला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com