Rahul Gandhi
Rahul Gandhi

राहुल गांधी भाषणासाठी स्टेजवर आले अन् थोडक्यात बचावले, नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल Video

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. अशातच राहुल गांधींचा एका व्हायरल व्हिडीओनं खळबळ उडाली आहे.
Published by :

Rahul Gandhi Falls On Stage Video Viral : देशात लोकसभा निवडणुकीसाठी सहा टप्प्यांतील मतदानप्रक्रिया पार पडली आहे. आता १ जूनला सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी सभांचा धडाका लावला आहे. अशातच राहुल गांधींचा एका व्हायरल व्हिडीओनं खळबळ उडाली आहे.

राहुल गांधी स्टेजवर गेल्यावर नेमकं काय घडलं?

बिहारच्या पालीगंजमध्ये काँग्रेसने रॅलीचं आयोजन केलं होतं. त्याचदरम्यान राहुल गांधी भाषण करण्यासाठी एका स्टेजवर गेले असता, त्या स्टेजचा काही भाग अचानक कोसळला. पण राहुल गांधी खाली पडता पडता वाचले. आरजेडीच्या नेत्या मीसा भारती यांनी राहुल गांधींचा हात धरला, त्यामुळे ते स्टेजवरून खाली पडता पडता थोडक्यात बचावले.

इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी बिहारमध्ये आले होते. पटनासाहीब, पाटलीपत्र आणि आराह या ठिकाणी राहुल गांधी यांच्या सभेच आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान राहुल गांधी पाटणा येथील पालीगंजच्या सभेसाठी गेले असता स्टेजवर जाताना अचानक स्टेजचा काही भाग खचला आणि ते खाली पडता पडता वाचले. त्यावेळी स्टेजवर सुरक्षा कर्मचारीही तिथे पोहोचले आणि राहुल गांधी यांना सावरण्याचा प्रयत्न केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com