Possibility of an alliance between the Shiv Sena Shinde faction and the Congress in the Kolhapur Municipal
Possibility of an alliance between the Shiv Sena Shinde faction and the Congress in the Kolhapur Municipal

Maharashtra Politics : कोल्हापूर महापौरपदासाठी शिवसेना-काँग्रेस युती?

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी अनेक शहरांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
Published by :
Riddhi Vanne
Published on

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या, तरी अनेक शहरांमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे महापौरपदासाठी मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार असून राज्यभर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी कोणाचा महापौर बसेल, यावर चर्चा रंगल्या आहेत.

अशातच कोल्हापुरातून महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. येथे शिवसेना शिंदे गट काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी याबाबत थेट खुलासा न करता, “सध्या सुरू असलेल्या चर्चांवर बोलता येणार नाही,” असे सूचक विधान केले. त्यामुळे नव्या युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसकडे 37 जागा असून बहुमतासाठी अजून आकडे कमी पडतात. भाजपकडे 27 तर शिंदे गटाकडे 15 नगरसेवक आहेत. बहुमताचा आकडा 41 असल्याने गणित कोणत्याही बाजूने फिरू शकते. शिंदे गटाने काँग्रेसला साथ दिल्यास सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे कोल्हापुरात महापौरपद नेमके कोणाकडे जाणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

थोडक्यात

  1. महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

  2. मात्र अनेक शहरांमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.

  3. त्यामुळे महापौरपदासाठी मित्र पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.

  4. यामुळे राज्यभर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

  5. मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये महापौर कोण होणार, यावर जोरदार चर्चा सुरू आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com