BJP MP: भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ? नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू

BJP MP: भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ? नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे.
Published by :
shweta walge

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या काही विद्यमान खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे. जे.पी.नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर घेतला खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतला त्यावेळी फेरबदलांवर चर्चा करण्यात आल्याची शक्यता आहे.

राज्यात सुमार कामगिरी असलेल्या भाजप खासदारांची तिकीट कापण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्या खासदारांच्या जागी काही नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे.

BJP MP: भाजपच्या अनेक विद्यमान खासदारांना नारळ? नव्या चेहऱ्यांची चाचपणी सुरू
'मतदानासाठी देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला गृहीत धरूच नये' मनोज जरांगेंचा थेट इशारा

भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावेळी भाजप खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची माहिती आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com