Admin
बातम्या
'आता नंबर बापटांचा का…?' भाजपच्या उमेदवारीवरून कसब्यात लागले पोस्टर
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
कसबा पेठ मतदार संघात भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठीतील विधानसभेची जागा रिक्त झाली. यानंतर भाजपकडून कसबा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता होती. मात्र टिळक कुटुंबातील व्यक्तीला भाजपने उमेदवारी दिली नाही.
यावरुन कसब्यात पोस्टरबाजी करण्यात आली आहे. "कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा मतदारसंघ गेला आता नंबर बापटांचा का...??? समाज कुठवर सहन करणार? कसब्यातील एक जागरूक उमेदवार" असे कसब्यात लावण्यात आलेल्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
हा फ्लेक्स नेमका कोणी लावला? याची माहिती अजून मिळाली नाही आहे. आता काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.