आ.रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कृषी महोत्सवातील मोदी, शाह, राणांचे प्रशासनाने हटवले पोस्टर

सुरज दहाट, अमरावती

आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानामध्ये युवा स्वाभिमान पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त कृषी प्रदर्शनी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्या ठिकाणी अनेक बॅनर पोस्टर लागले होते, त्या पोस्टरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा ,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचे पोस्टर लागले होते.

मात्र अमरावती विभागात पदवीधर निवडणूक होत असताना आचारसंहिता सुरू असून आपण राजकीय फोटो का लावले असा ठपका प्रशासनाने ठेवला. त्यानंतर त्या संपूर्ण कार्यक्रमातील प्रशासनाने पोस्टर काढले, मात्र हे षडयंत्र काँग्रेसचे असून काँग्रेसने तक्रार केली त्यानुसार प्रशासनाने पोस्टर काढल्याचा आरोप युवा स्वाभिमान पक्षाने केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com