सातारा शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा बंद;  महावितरणाच्या संपाचा ग्राहकांना बसला 'झटका'

सातारा शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा बंद; महावितरणाच्या संपाचा ग्राहकांना बसला 'झटका'

महावितरणाचे खाजगीकरण करू नये यासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजल्यापासून तीन दिवस संप पुकारला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

प्रशांत जगताप, सातारा

महावितरणाचे खाजगीकरण करू नये यासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्री 12 वाजल्यापासून तीन दिवस संप पुकारला आहे. याचा परिणाम सातारा शहर आणि ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात बत्ती गुल होत असल्याने महावितरणच्या संपाचा 'झटका' ग्राहकांना बसायला सुरुवात झालीये.

सातारा शहरातील काही भागात आणि ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला असून नागरिकांची गैरसोय व्हायला सुरुवात झालीये. आज पहाटे 3 वाजल्यापासून काही भागात वीजपुरवठा बंद झालाय. महावितरण कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला रात्री 12 वाजल्यापासून सुरुवात झाली असून यावर लवकर तोडगा न निघाल्यास जिल्हावासीयांना बत्ती गुलच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com