निकालात घोटाळा झाला? केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी मांडलं गणित
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. महायुतीला घवघवीत यश मिळालं. महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर तसेच निवडणूक आयोगावर शंका व्यक्त केली जाऊ लागली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेत सायंकाळी ५ नंतर मतांची टक्केवारी वाढली कशी असा सवाल विचारत गंभीर आरोप केले आहेत. अशातचा आता केंद्रीय अर्थमंत्र्यांचे पती अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांनी गणित मांडलं आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच त्याचं विश्लेषण सुरू झालं. सत्ताधारी वर्गाकडून हा मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं जात होतं. विरोधकांकडून मात्र ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यात आता केंद्रीय अर्थमंत्री व भाजप नेत्या निर्मला सीतारमण यांचे पती व अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांचा समावेश झाला असून त्यांनी मतांच्या टक्केवारीचं गणितच आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी मांडलं आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या आधीही मतांच्या टक्केवारीत झालेल्या वाढीवर त्यांनी बोट ठेवलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी प्रभाकर परकला यांच्या ट्विटचा दाखला देत जोरदार टीका केली आहे. पाहा रोहित पवार यांचे ट्विट -
काय म्हटले प्रभाकर परकला?
५० तासांत ७६ लाख मतांची नव्याने भर पडली?
“मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती.
ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात.
त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवाऱी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली.
हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे.
त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली.
एवढंच नाही, तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची भर
पाहा प्रभाकर परकला यांचं ट्विट-