Velupillai Prabhakaran Alive
Velupillai Prabhakaran AliveTeam Lokshahi

प्रभाकरन जिंवत? एलटीटीई नेत्याचा दावा; श्रीलंकेकडून स्पष्टीकरण...

श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळला.

श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमच नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भारतासह श्रीलंकेत देखील खळबळ माजली आहे. प्रभाकरनबाबत जागतिक तमिळ महासंघाचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी हा दावा केला आहे. आमचे तामिळ राष्ट्रीय नेते प्रभाकरन जिवंत असून ते बरे आहेत. असा दावा त्यांनी केला आहे.

Velupillai Prabhakaran Alive
आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले, गद्दार गॅंगवर...

नेदुमारन म्हणाले की, आमचे तामिळ राष्ट्रीय नेते प्रभाकरन जिवंत असून ते बरे आहेत, हे सांगताना मला आनंद होत आहे. ते म्हणाले, लवकरच योग्य वेळ आल्यावर प्रभाकरन जगासमोर येईल. ते लवकरच तामिळ वंशाच्या मुक्तीसाठी योजना जाहीर करणार आहेत. जगातील तमाम तमिळ जनतेने संघटित होऊन त्याला पाठिंबा दिला पाहिजे. असे मत त्यांनी मांडले आहे.

प्रभाकरनची 2009 मध्ये हत्या झाली होती

21 मे 2009 रोजी, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (LTTE किंवा LTTE) चे संस्थापक वेलुपिल्लई प्रभाकरन यांना श्रीलंकेच्या सैन्याने फाशी दिली. यासह श्रीलंकेतील जाफना प्रदेश लिट्टेच्या दहशतीतून मुक्त झाला. प्रभाकरन मारला गेल्यानंतर, एलटीटीईने शरणागतीची घोषणा केली.

प्रभाकरन जिवंत असल्याचा दाव्यावर श्रीलंकाचे स्पष्टीकरण

'लिट्टे' प्रमुख प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तर, श्रीलंकेच्या लष्कराने हा दावा फेटाळून लावला आहे. श्रीलंकन लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर रवी हेराथ यांनी प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा फेटाळला. त्यांनी म्हटले की, प्रभाकरन ठार झाल्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. त्यामध्ये डीएनए अहवालाचा समावेश आहे. त्याआधारे प्रभाकरन ठार झाल्याचे सिद्ध होत असल्याचे त्यांनी 'एबीपी नाडू'सोबत बोलताना सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com