पवारांकडे समितीचा ठराव सादर; विचार करण्यास पवारांनी मागितला वेळ - प्रफुल्ल पटेल
Admin

पवारांकडे समितीचा ठराव सादर; विचार करण्यास पवारांनी मागितला वेळ - प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भावूक झाले आहेत. तर, शरद पवारांनी निर्णय घेताना विश्वासात न घेतल्याने राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये नाराजीच्या चर्चा आहेत. परंतु, हा निर्णय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही.

याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. पवारांनी अध्यक्ष राहावे बैठकीत ठराव करण्यात आले आहे. त्यामुळे समितीनं राजीनामा फेटाळल्यानंतर शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

त्यानंतर सिल्वर ओकवरील बैठक संपली असून पवारांकडे समितीचा ठराव सादर करण्यात आला आहे. शरद पवार हे ठरावावर विचार करणार आहेत. पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला आहे. असे प्रफुल पटेल म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com