Prajakta Mali On Suresh Dhas: सुरेश धस यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया
भाजपा आमदार सुरेश धस यांनी प्राजक्ता माळी यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून दिलगिरी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी प्राजक्ता माळी यांच्या बाबत धस यांनी वादग्रस्त विधान केले होते. आणि याच विधानावरून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची जोड उठली होती. यानंतर अखेर धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.याचपार्श्वभूमीवर आता प्राजक्ता माळीची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाली प्राजक्ता माळी ?
मी संपूर्ण महाराष्ट्राचे आभार मानते ...पत्रकार परिषद घेतल्यापासून प्रत्येक स्तरातून मला पाठिंबा मिळाला, मी आमदार सुरेश धस यांचे सुद्धा आभार मानते... त्यांनी खूप मनाचा मोठेपणा दाखवला, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य आहे हे त्यांनी दाखवले... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुद्धा मी आभार मानते की, त्यांनी जातीने या सगळ्यामध्ये लक्ष घातलं आणि अत्यंत संवेदनशील पणे हा विषय हाताळला... त्यासोबत रूपाली चाकणकर आणि महिला आयोगाचे सुद्धा आभार मानते...
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी प्राजक्ता माळी म्हणाली,
पुढे प्राजक्ता म्हणाली की, संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळलेला आहे, त्या हत्याप्रकरणी संबंधित गुन्हेगारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे ही आमची सुद्धा मागणी आहे... आणि आमदार सुरेश धस यांनी माफी मागितल्यामुळे आता मी कोणतीही कारवाई करणार नाही आणि या प्रकरणावर पडदा टाकत आहे, असं प्राजक्ता माळी म्हणाली आहे.