Prajakta Mali : प्राजक्ता माळीने कोणासोबत केलं रोमँटिक फोटोशूट; 'तो' तरुण कोण? फोटो व्हायरल
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते यासोबतच ती चर्चेत देखील असते. प्राजक्ता माळी तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यातच प्राजक्ता माळी लग्न कधी करणार आणि कोणासोबत करणार याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगलेली पाहायला मिळते.
यातच आता प्राजक्ता माळीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये प्राजक्ता एका मुलासोबत दिसत आहे. त्यामुळे या फोटोंची आता चांगली चर्चा रंगली असून हे फोटो 2019 मध्ये प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर शेअर केले होते. हे फोटो शेअर करून तिने "युरोप च्या गल्यांमध्ये रोमॅंटीक फोटोज नाही काढले तर मग काय फायदा..." असे कॅप्शन देखील दिलं होते.
प्राजक्तासोबत हे फोटोशूट करणाऱ्या तरुणाचं नाव अलोक भदाणे असं आहे. प्राजक्ताने हे फोटो शेअर करत या तरुणाचे आभार देखील मानले होते आणि "माझा फोटो पार्टनर झाल्याबद्दल आणि युरोप ट्रीपमध्ये माझे चांगले फोटो काढल्याबद्दल धन्यवाद" असे म्हटले होते.