आरक्षणावरील तोडग्याची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; शरद पवारांच्या सल्ल्यावर आंबेडकरांची जहरी टीका

आरक्षणावरील तोडग्याची भूमिका म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा; शरद पवारांच्या सल्ल्यावर आंबेडकरांची जहरी टीका

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
Published by :
shweta walge
Published on

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. यातच आरक्षणाच्या प्रश्नावर तोगडा काढण्यासाठी सरकारने लक्ष्मण हाके, छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांना एकत्रित करुन निर्णय घ्यावेत आणि बैठक घ्यावी", असा मार्ग राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुचवला होता. यावरच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी कडाडून टीका केली आहे.

पवारांनी आरक्षणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी केलेले वक्तव्य म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली. ते परंडा येथे वंचित बहुजन आघाडीच्या आरक्षण बचाव यात्रेत ते बोलत होते.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर प्रकरणावर शरद पवारांनी केलेले वक्तव्य म्हणजे आगीत तेल टाकण्याचा प्रकार असल्याचे आंबेडकर म्हणाले. पवारांना सामाजिक तणाव उभा करायचा आहे, अशी टीका त्यांनी केली. तसेच, सर्व पक्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण मागणीच्या भूमिकेबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आंबेडकर यांनी आवाहन केले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com