दारू प्या, मटण खा, पैसे घ्या, पण मतदान कमळाला करू नका, अर्धी चड्डी, फूल चड्डीवाल्यांपासून सावध राहा - प्रकाश आंबेडकर

दारू प्या, मटण खा, पैसे घ्या, पण मतदान कमळाला करू नका, अर्धी चड्डी, फूल चड्डीवाल्यांपासून सावध राहा - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलं होतं.

वंचित बहुजन आघाडीने बुलढाण्यात आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्यात प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस दरवाढ करून महिलांना पुन्हा धुरात लोटले आहे. एखादा दारुडा जसे घरातील सर्व काही विकतो. तसे हे सरकार देखील लुटारुंचे सरकार आहे, दारूड्यांचे सरकार आहे, अशी टीका त्यांनी केली. अर्धे चड्डीवाले पूर्ण पँट घालायला लागले.

तसेच ते म्हणाले की, कमळावाले आणि अर्धी चड्डीवाले जर मतदान मागायला आले तर त्यांना मतदान करू नका. ते तुम्हाला दारू देतील मस्तपैकी प्यायची कोंबड्या दिल्या तर मस्तपैकी खायच्या महात्मा गांधी आपल्याकडे पाठवले तरी घ्यायचे पण मतदान कमळाला? नाही करायचं, लोकशाही वाचली पाहिजे. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.

त्यामुळे माझी आदिवासींना विनंती आहे की, अर्धी चड्डी, फूल चड्डीवाल्यांपासून सावध राहा आणि त्यांच्या विरोधात उभे रहा. एखादा दारुडा जसे घरातील सर्व काही विकतो. तसे हे सरकार देखील लुटारुंचे सरकार आहे, दारूड्यांचे सरकार आहे. असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com