एकनाथ शिंदे भाजपाला डोईजड ठरू शकतात - प्रकाश आंबेडकर

एकनाथ शिंदे भाजपाला डोईजड ठरू शकतात - प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक वक्तव्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल एक वक्तव्य केलं आहे. काल (19 मे) त्यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेतली.

यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, कर्नाटकच्या निकालानंतर अनेकजण मोकळेपणाने बोलत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे नोंदणीकृत शिवसेना गेल्याने ठाकरे अडचणीत आले आहेत.

यासोबतच ते म्हणाले की, अमित शाह यांच्या ४८ जागा जिंकण्याचा दावा बरेचसे सांगून जातो.सरकार तूर्तास स्थिर असले तरीही राज्यात ऑगस्टपर्यंत अस्थिरता असेल. अपात्रतेबाबतच्या निर्णयापर्यंत नवा पक्षही नोंदणीकृत करू शकत नाही. तर, शिंदे हे भाजपला डोईजड ठरू शकतात असे आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com