बातम्या
लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी; प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांना टोला
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबरोबर घेतलेला पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच घेतला होता, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. अनेक प्रतिक्रिया यावर येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, “अजित पवारांनीही तिच भूमिका मांडली होती. मला एकट्याला कशाला दोष देत आहात, माझ्या पक्षाचा निर्णय होता. त्यामुळे आम्ही सांगत होतो, लग्न लावायचं गंगूशी आणि संसार करायचा सावित्रीशी… हे मांडलेलं खर ठरलं,” असा टोला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांना लगावला आहे.