Prakash Aambedkar
Prakash Aambedkar

प्रश्न सुटत नसेल तर आमदार, खासदारांना मारा; प्रकाश आंबेडकर

राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या प्रमुख मागणीसाठी मागील दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत.

राज्यातील 861 विद्यार्थी बार्टीची फेलोशिप मिळावी या प्रमुख मागणीसाठी मागील दीड महिन्यापासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. यावर अनेकजणांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आझाद मैदानात या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलं आहे. पंतप्रधानांनी डिग्री घेतली असेल तर त्यांनी लोकांना पुढे मांडावी. घाबरण्याचे कारण नाही. असे ते म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, मी विद्यार्थ्यांना सांगितलं आहे, तुमचे प्रश्न सुटत नसेल तर आमदार आणि खासदारांना मारा. निवडून दिलेले अनुसूचित जाती, जमातीचे आमदार आणि खासदार प्रश्न सोडवण्यता कच खात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यांना बडवावे. माझं माझं मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे. त्यांची लवकरच भेट घेणार आहे. असे आंबेडकर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com