Prakash Ambedkar : नवी मुंबईच्या सभेत प्रकाश आंबेडकरांचे जनतेला आवाहन, "उद्याचे मतदान हे लुटारुंच्या विरोधातील..."
भिवंडीमध्ये होणारे उद्याचे मतदान हे अन्याय आणि लूटमार करणाऱ्या शक्तींविरोधात असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं. नागरिकांनी जागरूक राहून मतदान करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. रविवारी मानसरोवर येथील महात्मा फुले चौकात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी पालिका निवडणुकीतील उमेदवार आणि अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आज लोकशाहीवर संकट आहे. कोणत्याही समाजाने भीती बाळगू नये. संविधान प्रत्येकाला धर्म पाळण्याचं स्वातंत्र्य देतं. वंचित बहुजन आघाडी सर्व समाजांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. जबरदस्ती आणि दडपशाही करणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं की, देशाला गुलाम करणारी मानसिकताच खरी दोषी आहे. त्यांनी नागरिकांना निर्भयपणे मतदान करून लोकशाही मजबूत करण्याचं आवाहन केलं.
थोडक्यात
उद्याचं मतदान लुटारुंच्या विरोधातील लोकशाही वाचवणारं...
जनतेनं सतर्क राहून मतदान करण्याची गरज...
प्रकाश आंबेडकरांचं जनतेला आवाहन

