“ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असं कोणाला म्हणाले?

“ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असं कोणाला म्हणाले?

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’कडून वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलं नसल्याने अनेक चर्चाणा उधाण आलं आहे.
Published by  :
shweta walge

देशातील प्रमुख विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’कडून वंचित बहुजन आघाडीला सामावून घेण्याबाबत कुठलाही प्रस्ताव आलं नसल्याने अनेक चर्चाणा उधाण आलं आहे. शशी सिंग नावाच्या व्यक्तीने वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’मध्ये समावेश करण्याच्या मुद्द्यावर ॲड. प्रकाश आंबेडकरव काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्विट केले.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्या ट्विटचे फोटो शेयर करत ‘ना कबुतर, ना फोन, कुछ नही आया’ असे म्हणत हे फेक असल्याचे स्पष्ट केल आहे. ही तर काँग्रेसची कार्यपद्धती असल्याची टीका त्यांनी केली.


दरम्यान, वंचितच्या ‘इंडिया’तील समावेशावरून तर्क-वितर्क लावले जात असतानाच एक फेक ट्विट करण्यात आले. शशी सिंग नावाच्या व्यक्तीने केलेल्या या ट्विटमध्ये वंचित बहुजन आघाडीचा ‘इंडिया’मध्ये समावेशावरून ॲड. प्रकाश आंबेडकर व अशोक चव्हाण यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी त्याचा स्क्रिनशॉर्ट शेयर करत हा फेक मॅसेज असल्याचे ट्विट केले. ‘ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे. कुठलाही पत्रव्यवहार न करता हे लोकांना सांगत फिरतात,’ अशा शब्दात ॲड. आंबेडकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

“ना कबुतर आया, ना फोन…”, ॲड. प्रकाश आंबेडकर असं कोणाला म्हणाले?
'शिंदे-फडणवीसांसोबत आलो म्हणून...' भुजबळांचं 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण

दरम्यान, ‘इंडिया’ची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडणार आहे. ‘इंडिया’ नावाखाली विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. सत्ताधारी भाजप विचारधारेच्या विरोधातील सर्वपक्षांनी यामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न वरिष्ठ नेत्यांकडून केला जात आहे. ‘इंडिया’ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश होणार का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com