'लाठीचार्ज कुठे करावा यावर शासनाने नियम केला पाहीजे', बदलापूर लाठीचार्जवर प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
कुठल्या विषयावर लाथीचार्ज करावा आणि कुठं करू नये यावर शासनाने नियम केला पाहिजे. लोकं अत्याचाराविरोधात आंदोलन करत होते, रेल्वे बंद झाल्यामुळे लोकांना त्रास झाला, पण अशा संवेदनशील विषयावर पोलिसांनी लाठीचार्ज आणि शासनाने लाठीचार्ज करायला सांगणे या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. शासन आणि पोलीस यांचा मी निषेध करतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
देश हेटरेटमुळे समाज गुन्हेगारी करायला लागला आहे. त्याचेच हे परिणाम आहे. संस्था स्वतः देश आणि पॉलिटिकल पार्टी यांनी संयम आणि शांतता करायला पाहिजे. दुर्दैवाने आरएसएस बजरंग दल आणि भाजप तिन्ही पक्ष वायलंस फ्रिज करत आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्यावर याची सुरक्षा करणे हे पोलिसांचं काम आहे. पण आंदोलकांना शांत कसं करायचं हे पोलिसांचं काम आहे. लोकांसोबत व्यवस्थित बोलणं झाला असता तर हे शांतता राहिली असती. या सगळ्याचा अभाव या ठिकाणी दिसून आला म्हणून लाठीचार्ज झाला असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.