इथं लोकांची हुकूमशाही आहे, कोणत्या पंतप्रधानाची नाही; पंतप्रधान मोदींचं नाव घेत प्रणिती शिंदेंनी भाजपावर साधला निशाणा
Admin

इथं लोकांची हुकूमशाही आहे, कोणत्या पंतप्रधानाची नाही; पंतप्रधान मोदींचं नाव घेत प्रणिती शिंदेंनी भाजपावर साधला निशाणा

सोलापुरातील हाथ से हाथ जोडो अभियानात प्रणिती शिंदे हजर होत्या, यावेळी त्यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे.

वसीम अत्तर, सोलापूर

सोलापुरातील हाथ से हाथ जोडो अभियानात प्रणिती शिंदे हजर होत्या, यावेळी त्यांनी भाजपावर चांगलाच निशाणा साधला आहे.

लोकांच्या अडीअडचणीत, सुखदुःखात आम्ही आहोत. निवडणुकीत आम्ही नाही येणार मात्र जेव्हा तुम्हाला मदत पाहिजे, तेव्हा काँग्रेस येणार आणि जर नाही आलो तर कान धरून खाली बसवा. तो तुमचा अधिकार आहे.

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा अधिकार आहे. देशात लोकशाही आहे. लोकांची शाही आहे ती लोकशाही. इथं लोकांची हुकूमशाही कोणत्या पंतप्रधानाची नाही, असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com