Praniti Shinde : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Praniti Shinde : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण ११ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. यातच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आज उत्सव आहे. आज आपण लोकशाहीचा जयघोष करणार आहोत. आज लोक दाखवणार आहे लोकशाहीच ताकद काय असते. आपण सगळे मतदान करुया आणि सोलापूरची विकासाची वाट धरुया.

तसेच त्या पुढे म्हणाल्या की, लोकांचा मनात एकप्रकारचा रोष दिसतो आहे. कारण मागच्या दहा वर्षात त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय झाला. शेतकरी असतील, कामगार असतील, सर्वसामान्य लोक असतील. पाणी असेल, महागाई असेल, रस्ते असतील, बेरोजगारी असेल. एकंदरीत तो रोष दिसून येतोय. हुकूमशाहीच्याविरोधात पण एक लाट दिसून येत आहे. म्हणून आज आपण लोकशाही साजरी करुया. लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली आहे. अशी प्रतिक्रिया दिसून आली. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com