Prasad Lad On Sanjay Raut's Book : 'राऊत म्हणजे उलट्या पायाचा बांडगुळ'; प्रसाद लाड यांची जहरी टीका

भाजप नेते प्रसाद लाड यांनीही संजय राऊत यांना पुस्तक लिहिण्यावरून टोला लगावला आहे.
Published by :
Rashmi Mane

संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' ( Sanjay Raut Book Narkatla Swarg ) या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे. मात्र त्या आधीच या पुस्तकामुळे राजकीय वर्तुळात चर्चासत्र रंगल आहे. विविध स्तरातील राजकीय नेत्यांकडून पुस्तकासंबंधी प्रतिक्रिया येऊ लागल्या आहे. विरोधकांनी संजय राऊत यांच्या पुस्तकातील मजकुराबाबत टीका केली असून भाजप नेते प्रसाद लाड यांनीही संजय राऊत यांना पुस्तक लिहिण्यावरून टोला लगावला आहे.

प्रसाद लाड म्हणाले की, "मला वाटतं की संजय राऊत हा उलट्या पायाचा बांडगुळ आहे. स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही ना काही रोज करत राहायचं. आणि मीडियामध्ये येत राहायचं. याच्यापलीकडे त्यांना काही उद्योग नाही. नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहित असताना, मला संजय राऊतांना सांगायचंय. 14 वर्ष ज्या पत्रा चाळीतील गोरगरीब मराठी रहिवाशांना नरकात ठेवण्याच काम तुम्ही जे केलं. यावरही एक पुस्तक लिहिलं असतं, तर बर झालं असतं."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com