कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये...; - प्रशांत किशोर
Admin

कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये...; - प्रशांत किशोर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत काँग्रेसने 224 जागांपैकी 136 जागांवर विजय मिळवत कर्नाटकाची सत्ता काबीज केली आहे. तर दुसरीकडे भाजपचा या निवडणुकीत दारूण पराभव झालाय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात या विजयाचा काँग्रेसकडून जल्लोष करण्यात येतोय. तर यावर विविध नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत.

याचपार्श्वभूमीवर आता प्रशांत किशोर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, कर्नाटकच्या विजयानं काँग्रेसनं जास्त खूश होऊ नये कारण 2013 मध्येही कर्नाटक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसचा पराभव झाला होता. असे प्रशांत किशोर म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com