Prashant Koratkar : प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक; आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार
प्रशांत कोरटकर याने इंद्रजित सावंत यांना धमकी देताना छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. प्रशांत कोरटकर याचा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस शोध घेत होते. अखेर काल प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर तेलंगणातून पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज पोलिसांची टीम त्याला घेऊन कोल्हापुरात दाखल होणार आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात कोरटकरला सुरवातीला आणण्यात येणार असून अटकेची प्रक्रिया पार तिथे पार पडणार आहे. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कोल्हापूर न्यायालयात हजर केलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दुपारपर्यंत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असून कोरटकरला बेल मिळणार की जेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर सोमवारी मुंबई हायकोर्टानंही त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.