Pratap Sarnaik On MNS Morcha : "मी देखील मोर्चात सहभागी होणार, मला अटक करुन दाखवा"; मंत्री प्रताप सरनाईक संतापले
मराठी भाषेच्या वादावरुन आज मीरा-भाईंदरमध्ये मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं असून, अनेकांना कारवाईची धमकी देण्यात आली. त्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी आता या गोष्टीचा निषेध सुरु केला आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचपार्श्वभूमिवर मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावर आपली प्रतिकिया दिली आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "मराठी एकीकरण समितीचे काही कार्यकर्ते जेव्हा पोलिसांकडे परवानगीसाठी गेले होते, त्यावेळेस त्यांना परवानगी नाकारण्यात आली. परंतु परवानगी नाकारत असताना त्यांनी अनेक कार्यकर्तांना नोटीस पाठवल्या तर काहींना तडीपरची नोटीस दिली. गेली चार टर्म मी आमदार आहे. शांतताप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. आताच मी पोलीस आयुक्तांशी बोलून नाराजी वर्तवली. अशा प्रकारे कारवाई नको".
"व्यावसायिकांचा मोर्चा झाला तर मग मराठी एकीकरण समितीला का परवानगी दिली नाही. कार्यकर्त्यांना घरातून उचलणे याला माझा विरोध आहे. मी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सोबत चर्चा करणार आहे. त्यांना याबाबत सांगण्यात आले की आपल्या सरकारची तुलना इंग्रजांबाबत केली जाते हे चुकीचे आहे. तिकडे पोलीस धरपकड करत आहेत जमावबंदी लागू करण्यात आले मात्र आधी मोर्चा होऊन द्यायला पाहिजे होता".