चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

चंद्रपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या...

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी यादी जाहीर करण्यात आली. या यादीत काँग्रेसने चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिभा धानोरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, 2019 च्या निवडणूकीत असाच संघर्ष बाळू धानोरकर यांचा झाला होता. त्या संघर्षानंतर दहा महिन्यानंतर त्यांचं निधन झालं.

त्या पुढे म्हणाल्या की, मला विश्वास आहे की, त्यांनी सर केलेला हा गड मी नक्की या ठिकाणी कायम ठेवीन आणि त्यांनी टाकलेला हा विश्वास, त्यांनी माझ्या खांद्यावर दिलेली ही जबाबदारी मी यशस्वीपणे पार करीन. माझ्यासमोर जे उमेदवार म्हणून आहेत. आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नेते. त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली. सतत ते आमदार, विद्यमान मंत्री म्हणून काम करत आहेत. माझ्यासाठी ही लढाई इतकी सोपी नाही आहे. अतिशय राजकारणाचा दांडगा अनुभव त्यांना आहे. त्याच्यासाठी ही लढाई माझ्यासाठी लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशा पद्धतीची असेल.

संघर्ष केल्याशिवाय माणूस मजबूत होत नाही. या सगळ्या संघर्षाच्या काळात मी एक स्टेटस ठेवला होता. जितना संघर्ष बडा होगा जीत उतनी शानदार होगी. संघर्ष जरी करावा लागला असेल तरी ही लढाई लढत असताना ही लढाई फक्त माझी वैयक्तिक लढाई नाही आहे. आताची आमची लढाई ही हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. ही आमची लोकशाही आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे. त्याच्यामुळे सगळं एकत्र येतील आणि काम करतील. पक्षाची जी ध्येय धोरणे आहेत. आमचा पक्ष हा लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. उमेदवारी अर्ज आम्ही 27 तारखेला दाखल करणार आहोत. असे प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com