Pratibha Dhanorkar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

Pratibha Dhanorkar : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा अधिकार बजावला.
Published by :
Siddhi Naringrekar

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी माध्यमांशी बोलताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, आज हा लोकशाहीचा उत्सव आहे. या लोकशाहीच्या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. निवडणूका म्हटल्यावर प्रतिस्पर्धी म्हटल्यावर ते आपल्या पक्षाच्या बाजूने बोलतील, मी आपल्या पक्षाच्या बाजूने बोलतील.

यासोबतच त्या पुढे म्हणाल्या की, आरोप - प्रत्यारोप हे चालत राहणार. पण मतदान कसं होते हे अत्यंत महत्वाचे आहे. मला विश्वास आहे की या उत्स्फूर्तपणे सगळे मतदार माझ्यासोबत होते. या विदर्भात चंद्रपूर जिल्हा हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे. मागच्यावेळी देखील चंद्रपूरमधून काँग्रेसचा एकमेव खासदार निवडून गेला होता आणि तोच इतिहास यावेळी देखील सर्व मतदार कायम करणार आहेत.

सुधीरभाऊ या जिल्ह्याचे जेष्ठ नेते आहेत, पालकमंत्री आहेत. एक मोठा भाऊ म्हणून मी नेहमी त्यांचा मानसन्मान केला आणि आजही मतदानाच्या दिवशी या लोकसभेचं उमेदवार मनापासून शुभेच्छा माझ्या त्यांच्यासोबत आहेत. असं प्रतिभा धानोरकर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com