Praveen Darekar : प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा! म्हाडा कार्यालयात गणेशपूजन

Praveen Darekar : प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा! म्हाडा कार्यालयात गणेशपूजन

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी आज पदग्रहण करण्यापूर्वी म्हाडा येथील कार्यालयात श्री गणेश पूजन केले.
Published by :
Prachi Nate
Published on

प्रवीण दरेकरांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांनी आज पदग्रहण करण्यापूर्वी म्हाडा येथील कार्यालयात श्री गणेश पूजन केले.

महाराष्ट्र गृहनिर्माण स्वयं-समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून आज आमदार प्रविण दरेकर (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचा पदग्रहण समारंभ आज दुपारी 2 वाजता गृहनिर्माण भवन, कक्ष क्रमांक ४४३, तिसरा मजला, कलानगर, वांद्रे (पूर्व) येथे पार पडणार आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री उदय सामंत, मंत्री आशिष शेलार, अमिट साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री पंकज भोयर, प्रसाद लाड, चित्रा वाघ उपस्थित राहतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com