pravin darekar
pravin darekarteam lokshahi

चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगवर दरेकारांची प्रतिक्रिया ; म्हणाले...

भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे.
Published by  :
Team Lokshahi

भारताची चांद्रयान मोहिम यशस्वी झाली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या उतरले आहे. आज संध्याकाळी 06 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयानने दक्षिण ध्रुवाला स्पर्श केला आहे. यासोबतच भारताने इतिहास रचलेला आहे. यानिमित्त अवघ्या देशाकडून इसरोवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील; प्रतिक्रिया दिली आहे.

आजचा दिवस भारतासाठी अविस्मरणीय आणि अभिमानाचा आहे. चांद्रयान-3 आज दक्षिण ध्रुवावर लँडिंग झालेले आहे आणि भारताच्या गौरवात एक अनन्य साधारण अशा प्रकारची गोष्ट आपल्या वैज्ञानिकांनी केलेली आहे. त्या सर्व वैज्ञानिकांचे मनापासून अभिनंदन, टीमचे अभिनंदन. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, इस्रो आणि ज्यांनी ज्यांनी या अभियानात जीवाचे रान केले त्यांचे अभिनंदन! आज भारत शक्तिशाली, सामर्थ्यशाली होत असल्याचे या लँडिंगने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com