ऑपरेशन टायगरचा धसका? ठाकरेंच्या खासदारांचा हातात हात

ऑपरेशन टायगरचा धसका? ठाकरेंच्या खासदारांचा हातात हात

राज्यात आता 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे.
Published on

राज्यात आता 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरु झाली आहे. राजकीय वर्तुळातून यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना अरविंद सावंत म्हणाले की, त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. ज्यांच्या सरकारमध्ये गंभीर वाद सुरु आहेत. या सगळ्यांमधून दृष्टी कुठे दुसरीकडे वळवावी असा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नानुसार हा इथे जाणीवपूर्वक सकाळपासून बातम्या पसरवल्या जात आहेत. मुळात ज्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, ज्याच्यात एकमत नाही, सुसंवाद नाही किंवा विसंवाद सुरु आहे. सरकार मोठ्या संख्येनं येऊनसुद्धा रोज नवीन बातम्या आहेत. अनेक मंत्री गटांगळ्या खात आहेत. काल कार्यालयाचे उद्घाटन झालं. तेव्हाही सगळे खासदार होते. आताही 9च्या 9 खासदार इथे हजर आहेत. म्हणून आम्ही मुद्दाम सगळ्यांना एकत्र आणलं.

आमची वज्रमूठ आहे मजबूत. टायगर जिंदा है, आम्ही सगळे इकडे आहोत. रोज पुड्या सोडत असतात. टप्प्या टप्प्याने त्यांच्यातलीच माणसं तिकडे जाणार होतीत. मध्यंतरी संजय राऊत साहेबांनी सांगितले होते की, एक त्यांच्यातलाच माणूस आमदारांना घेऊन जात आहे. अशी बातमी होती त्याचे काय झालं?

एका निष्ठेने ही माणसं राहिलेली आहेत. इतक्या सगळ्या प्रसंगात आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत राहिलेले सगळे खासदार आहेत. काही चढउतार होऊ द्या. आम्ही सारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत आहोत. त्यामुळे ज्या कोणी बातम्या सोडत आहे त्यांना हे समोर आता चित्र दिसतं आहे. आम्ही कुठेच जाणार नाही. इथं निष्ठेने बसलेली माणसं आहेत यांच्याबद्दल संशय व्यक्त करु नका. हे सगळे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत आहेत. जे गेलेत ते भीतीपोटी गेलेत. आमचं हिंदुत्व बावन्नकशी, ढोंगी नाही. असे अरविंद सावंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com