पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार; संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. णाले.
Published by :
Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी वाराणसीतून निवडणूक लढवत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांना बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, हा त्यांचा निरोप समारंभ आहे. जेव्हा एका मोठ्या व्यक्तीचा निरोप समारंभ होतो तेव्हा अशी लोक उपस्थित राहतात. याआधी उद्धव ठाकरे त्यांचा अर्ज भरताना उपस्थित राहिले आहेत. यावेळेला ते नाहीत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, त्यामुळे त्यांची निरोपाची जी यात्रा आहे त्या यात्रेमध्ये त्यांचे लोक उपस्थित राहतील. निरोप समारंभ एका तिर्थस्थानी होणं ही चांगली गोष्ट असते. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com