Independence Day: पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन महत्त्वाची घोषणा |PM Modi Speech

Independence Day: पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन महत्त्वाची घोषणा |PM Modi Speech

देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. भारताने स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण केली आहेत.
Published by  :
shweta walge

देशात आज सर्वत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे. भारताने स्वातंत्र्याला 77 वर्षे पूर्ण केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10व्यां दा लाल किल्ल्यावरुन ध्वाजारोहण केलं. पीएम मोदी यांनी राष्ट्राला संबोधित करत लाल किल्ल्यावरुन महिला शक्तीचा जागर करत अनेक नवीन योजनांची घोषणा केली आहे.

महिला शक्तीचा जागर करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज भारत अभिमानाने सांगू शकतो की सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत. 2 कोटी करोडपती दीदींचे टार्गेट घेऊन आम्ही काम करत आहोत. महिला शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही काम करत आहोत.

भारताला पुढे नेण्यासाठी एक अतिरीक्त शक्तीची मदत होणार आहे. ती म्हणजे देशाची महिला शक्ती आहे. संपूर्ण जगातील सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहे. चांद्रयान असो किंवा चांद्र मोहिम यातही महिला वैज्ञानिकांचे योगदान मोठे आहे. नारी शक्तीला आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देत आहोत. जी २० मध्येही सर्व जगाने याला मान्यता देत कौतुक केले आहे. याला पाठबळही देत आहेत.

पीएम मोदी यांनी घोषित केलेल्या नवीन योजना

1. विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने लोकांसाठी विश्‍वकर्मा योजना सुरू करण्याची घोषणा केली. विश्वकर्मा योजनेत 15 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

2. देशात आतापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र होती. आता हे लक्ष्य 25 हजार औषधी केंद्राच केलं आहे. म्हणजे अजून 15 हजार जन औषधी केंद्र सुरु होतील. ही मोदीची गॅरेंटी आहे, पुढच्या पाच वर्षात भारताचा पहिल्या टॉप 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होईल.

3. शहरात जे लोक भाड्याच्या घरात राहतात. ज्यांच्याकडे स्वत:च घर नाही. जे अनधिकृत कॉलनीमध्ये राहतात. घर घेण्यासाठी बँकांकडून लोन मिळतं. त्यांना व्याजात सवलत दिली जाईल. त्यासाठी लवकरच घोषणा केली जाईल.

4. माझ लक्ष्य गावांमध्ये 2 कोटी लखपती दीदी बनवायच आहे. एग्रीकल्चर सेक्टरच्या माध्यमातून आम्ही वुमेन सेल्फ हेल्प ग्रुपची ट्रेनिंग देऊ. यात महिलांना ड्रोन चालवण्याच प्रशिक्षण देण्यात येईल. आम्हाला गावात महिलांना मजबूत करायच आहे.

Independence Day: पंतप्रधान मोदींची लाल किल्ल्यावरुन महत्त्वाची घोषणा |PM Modi Speech
Independence Day 2023 Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाला संबोधन; पाहा Live भाषण

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com