ताज्या बातम्या
जुन्या संसद भवनातून पंतप्रधान मोदींचं शेवटचं भाषण
आज जुन्या संसदेच्या इमारतीतील शेवटचा दिवस आहे. आजपासून नव्या संसद भवनामध्ये कामकाज सुरू होणार आहे.
आज जुन्या संसदेच्या इमारतीतील शेवटचा दिवस आहे. आजपासून नव्या संसद भवनामध्ये कामकाज सुरू होणार आहे. याचं पार्श्वभूमीवर सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी पंतप्रधान मोदींच शेवटच भाषण केल.“गणेश चतुर्थीच्या सर्वांना शुभेच्छा! नवीन इमारतीत नवीन संकल्प करण्यासाठी जात आहोत, नवीन आशा घेवून आपण जात आहोत” असं ते म्हणाले.
ते म्हणाले, सेंट्रल हॉल अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार! लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहाने मिळून 4 हजार कायदे तयार केले. देशातील अनेक महत्त्वाचे कायदे याच भवनातून लागू झाले. याच सभागृहात मुस्लिम समजातील महिलांना न्याय मिळाला. तीन तलाक विरोधी कायदा इथे तयार झाला.