Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल

Ayodhya Ram Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.
Published on

अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. अयोध्येतील घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात आले आहेत. सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिरात दाखल झाले आहेत. श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा विधीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी कुर्ता आणि धोतर असा खास पेहराव केला आहे. 

दुपारी 12.15 ते 12.45 वाजेपर्यंत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होईल. प्राणप्रतिष्ठेचा शुभमूहूर्त 12.29.08 ते 12.30.32 आहे. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. निमंत्रित पाहुण्यांची मंदिरात येण्यासाठी सुरुवात झाली आहे. राममंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यासाठी 10 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ड्रोनची नजर असणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com