PM Modi Meets Vishwas kumar Ramesh :  अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली

PM Modi Meets Vishwas kumar Ramesh : अहमदाबाद विमान अपघातातील एकमेव बचावलेले प्रवासी रमेश विश्वासकुमार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली

अहमदाबाद विमान अपघातातून बचावलेल्या रमेश यांची पंतप्रधानांकडून भेट
Published by :
Shamal Sawant
Published on

अहमदाबाद विमान अपघातातून एकमेव बचावलेला प्रवासी – विश्वेशकुमार रमेश हे सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहेत. भारतीय मूळ असलेले ब्रिटिश नागरिक असलेले रमेश हे लंडन गॅटविककडे जाणाऱ्या एअर इंडिया विमानात प्रवास करत होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच नियंत्रण सुटून ते बी.जे. मेडिकल कॉलेजजवळील रहिवासी परिसरात कोसळले. या भीषण दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, मात्र विश्वेशकुमार रमेश मात्र या मृत्यूच्या छायेतून अक्षरशः जीव वाचवून बाहेर पडले.

त्यांच्या प्रकृतीवर सध्या अहमदाबादमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान रमेश यांनी या अपघाता विषयी पंतप्रधान मोदी यांना सांगितले. ते म्हणाले काही सेकंदांत सर्वकाही संपल्यासारखे वाटले होते, पण अपघाताच्या धक्क्यानंतरही शुद्ध हरपून न जाता त्यांनी बाहेर पडण्याचा मार्ग शोधला आणि ते वाचले.

या अपघातात माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचाही मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी संपूर्ण घटनास्थळाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र, एकमेव बचावलेला रमेश हे आता या अपघात प्रकरणातील पुढील चौकशीसाठी एक आशेचे प्रतीक ठरले आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com