ताज्या बातम्या
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मुंबई आणि पालघरमध्ये नरेंद्र मोदींचे 2 कार्यक्रम आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराचं भुमिपूजन होणार आहे.
पंतप्रधान सुमारे १ हजार ५६० कोटी रुपयांच्या २१८ मत्स्यपालन प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करणार असल्याची माहिती मिळत आहे. सकाळी 11.30 वाजता नरेंद्र मोदी मुंबईत दाखल होणार असून नरेंद्र मोदी मुंबईतील विविध कार्यक्रमाला लावणार हजेरी लावणार आहेत.
यासोबतच पालघरमध्ये सुमारे ७६ हजार कोटी रुपये खर्चाच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२४ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार आहेत.