Narendra Modi
Narendra ModiTeam Lokshahi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट; म्हणाले...

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. .

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट करुन म्हणाले की, मी मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश आहे. या कामांमुळे राहणीमानाचा दर्जा उंचावण्यास चालना मिळेल, अशा शब्दात मोदींनी ट्विट केलं आहे.

Narendra Modi
विद्यापीठाची भिंत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात; सामनातून मोदींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com