विद्यापीठाची भिंत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात; सामनातून मोदींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य

विद्यापीठाची भिंत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात; सामनातून मोदींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. बीकेसीच्या मैदानावर भाजप मोठा कार्यक्रम घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावेळी वर्सोवा-घाटकोपर ही मेट्रो १ सेवा बंद ठेवली जाणार आहे. सायंकाळी ५.४५ ते ७.३० दरम्यान ही सेवा बंद ठेवली जाणार आहे.

याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा अग्रलेख सामनातून टीका करण्यात आली आहे. सामनातून म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भाजपने संपूर्ण मुंबईत झेंडे लावले आहेत. त्यात मिंधे गटानेही आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण मगरीने बेडूक गिळावा तसा हा गट गिळला गेला आहे. मगरीच्या जबड्यात जाताना हा बेडूक अखेरचे डराव डराव करत आहे. भाजपने जे कटआऊट्स लावले आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसला गेले होते. हा दौरा आटोपून ते परत आले. मुंबई विमानतळावर त्यांच्या गटाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी येताना खिशात एक लाख कोटींचे उद्योग करार आणले. ते करार जमिनीवर उतरल्यावरच स्वागत व्हावे. अर्थात तोपर्यंत हे सरकार टिकेल काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्रातून सवा दोन लाख कोटींचे प्रकल्प पळवून नेले. हा मुंबईवरील आर्थिक आघात आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणांच्या तोंडचा घास पळवून नेण्याचा प्रकार आहे. यालाच मुंबई-महाराष्ट्राचा भाग्योदय म्हणायचा का? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गाड्यांसाठी मुंबई विद्यापीठाची भिंत तोडण्यात आली. मुंबईच्या भागोदयाची सुरुवात विद्यापीठाची भिंत पाडून झाली. मुंबईतील एका महत्त्वाच्या वास्तूवर हातोडे घातले जात आहेत. तरीही आमच्या पंतप्रधानांचे स्वागत असो, नव्हे आहेच. असे सामनातून म्हटले आहे.

विद्यापीठाची भिंत तोडून मुंबईच्या भाग्योदयाची सुरुवात; सामनातून मोदींच्या मुंबई दौऱ्यावर भाष्य
पंतप्रधान मोदी आज मुंबईत; जाणून घ्या वाहतूक व्यवस्था कशी असेल
Lokshahi Marathi
www.lokshahi.com