PM Narendra Modi
PM Narendra Modi Team Lokshahi

काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी दाद दिली तर विरोधीपक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला.

काँग्रेसनं सहा दशकं देशाचं वाटोळं केलं. देशाच्या प्रश्नांवर कायमचं उत्तर शोधण्याचा काँग्रेसने कधीच प्रयत्न केला नाही. 60 वर्षात काँग्रेसनं देशात खड्डेच खड्डे खोदून ठेवले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात भाषणादरम्यान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी सत्ताधाऱ्यांनी दाद दिली तर विरोधीपक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत आपला विरोध दर्शवला.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

मागील 9 वर्षात आम्ही देशातील अडचणींवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. अडचणींपासून आम्ही पळणारे नाहीत, त्यावर उपाय शोधणारे आहोत. देशाच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच कायमची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला. देशात कमळ फुलवण्यात विरोधकांचं मोठं योगदान आहे. जेवढा चिखल फेकाल कमळ तेवढंच चांगलं फुलेल. काही लोकांची वक्तव्य देशाला निराश करतात, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.

PM Narendra Modi
तुम्हाला आम्हाला दुसरे उद्योग नाहीत का? उठसूठ निवडणुकीला सामोरे जायला- अजित पवार

दरम्यान 'मोदी-अदानी भाई भाई' अशी घोषणाबाजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ सुरु असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं भाषण सुरुच ठेवलं. यावेळी काँग्रेस आणि भाजप या पक्षात काय फरक आहे सांगितलं. काँग्रेस पक्षानं सहा दशकात देशातील अडचणीवर कधीच कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही मागील नऊ वर्षात देशातील अडचणीवर कायमचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे, यापुढेही करत राहू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com