पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर; ‘या’ गोष्टींवर असणार बंदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान मोदी येत्या 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.

मुंबईहून लवकरच दोन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू होणार असून, एक वंदे भारत ट्रेन मुंबई-सोलापूर मार्गावर तर, दुसरी मुंबई-शिर्डी मार्रगावर धावणार आहे. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मुंबई पोलिसांनी कलम 144 अंतर्गत अलर्ट जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी मुंबई पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत काम करत आहेत.अलर्टमध्ये मुंबई पोलिसांनी मरोळ, अंधेरी, कुलाबा, सीएसटी येथे पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या ठिकाणी ड्रोन आणि इतर गोष्टींवर बंदी घातली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com