PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर
पंतप्रधान मोदी 26 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. नरेंद्र मोदींच्या सभेच्या आयोजनासाठी ही बैठक झाल्याची माहिती मिळत आहे.
पुणे दौऱ्याच्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान मेट्रोतून प्रवास करणार असल्याची माहिती मिळत आहे. 26 सप्टेंबरला सिव्हील कोर्ट ते स्वारगेट या भुयारी मार्गाचं लोकार्पण करण्यात येणार आहे.
पंतप्रधान मोदी सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट स्थानकापर्यंत भुयारी मार्गातून प्रवास करणार असून पंतप्रधान स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन करणार आहेत. यासोबतच एसपी कॉलेजच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्वाचं आहे. काल पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक संपन्न झाली.