स्वातंत्र्याची 75 वर्षे:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास फेटा;  8 वर्षात मोदींनी घातलेल्या फेट्यांचे फोटो पाहा

स्वातंत्र्याची 75 वर्षे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा खास फेटा; 8 वर्षात मोदींनी घातलेल्या फेट्यांचे फोटो पाहा

देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

देशाचा आज ७५ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज शासकीय कार्यालये, संस्था, दिल्लीतील लाल किल्ला येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. 2014 मध्ये पंतप्रधान मोदींनी पांढरा हाफ बाही असलेला खादी कुर्ता आणि चुडीदार पायजमा परिधान केला होता. यासोबतच त्यांनी भगवा आणि हिरवा जोधपुरी बांधेज फेटा बांधला होता

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले असून यावेळी राष्ट्रगीत झाल्यानंतर लाल किल्ला परिसरात हेलिकॉप्टरच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. 2015 मध्ये पीएम मोदींनी क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा चुडीदार पायजमा घातला होता, तसेच पंतप्रधानांनी खादी रंगाचे जाकीटही परिधान केले होते. पीएम मोदींनी केशरी बांधणीचा फेटा बांधला, ज्यावर लाल आणि हिरवे पट्टे होते.

लाल किल्ल्यावर नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील महत्त्वाचे नेते आणि परदेशी पाहुणेदेखील उपस्थित आहेत. 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साधा कुर्ता आणि चुरीदार पायजमामध्ये दिसले होते. याशिवाय लाल-गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा राजस्थानी फेटा बांधला होता.

लाल किल्ल्यावर पोहोचण्याआधी नरेंद्र मोदी यांनी राजघाटावर जाऊन देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.2017 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाफ बाही कुर्ता परिधान केला होता. यावर्षी पंतप्रधानांनी चमकदार लाल आणि पिवळा फेटा घातला होता. या पगडीत मागे एक लांबट कापड बाहेर येत होते. जे खूप आकर्षक होते.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवरुनही देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुल बाहीचा कुर्ता पायजमा घातला होता आणि त्यासोबत त्यांनी उपर्णाही घातली होती. यावर्षी पंतप्रधानांनी गडद भगवा आणि लाल फेटा घातला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये हाफ बाही कुर्ता, पायजमाघातला होता. त्यावर पंतप्रधानांनी पिवळा, लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेरिया पॅटर्न असलेला फेटा घातला.

2020मध्ये मोदींनी भगवी आणि क्रीमकलरची टोपी घातली होती. हाफ बाही असलेला कुर्ता, पांढरा वरचा भगवा बॉर्डर असलेला एक फेटा परिधान केला होता.

पीएम मोदींनी 2021 मध्ये भगव्या रंगाचा फेटा घातला होता. या फेट्याचा रंग व कुर्त्यांचा रंग सेम होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com