Pankaja Munde, Pritam Munde
Pankaja Munde, Pritam MundeTeam Lokshahi

“सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”,प्रीतम मुंडेंचं पंकजा मुंडेंबाबत मोठं विधान

भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाशिक येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपली मोठी बहीण म्हणजेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
Published by :
shweta walge

भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी नाशिक येथे विद्यार्थ्यांना संबोधित करताना आपली मोठी बहीण म्हणजेच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “सगळे घाव झेलायला ताई आहे आणि मलाई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं.

प्रीतम मुंडे म्हणाल्या की, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही भाजपची घोषणा आहे. पण या घोषणेप्रमाणे प्रत्यक्ष ४० वर्षे राजकीय आयुष्य जगलेले गोपीनाथ मुंडेच आहेत. माझा जन्म मुंडेंच्या घरी झाला. माझ्याएवढं भाग्यवान कुणी नाही, असंच मला वाटतं. त्याहीपेक्षी माझं मोठं भाग्य म्हणजे , माझा जन्म पंकजा ताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे, आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे, असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, समोर असलेले विद्यार्थी कदाचित म्हणतील की, तुम्ही हे काय सांगत आहात. आयुष्यात संघर्ष करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावरून असे सांगू नये, असं काहीं विद्यार्थ्यांना वाटत असेल. पण इथल्या विद्यार्थ्यांना माझा प्रश्न आहे की, ठीक, आम्ही एक नशिबवान आहोत. पण गोपीनाथ मुंडेंचा कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्म झाला नव्हता. इथे कार्यक्रमात उपस्थित असलेले राहुल कराड यांचे वडील विश्वनाथ कराड यांचाही कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.आता राहुल कराड व्हायचं की विश्वनाथ कराड याचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला प्रीतम मुंडे व्हायचं आहे की गोपीनाथ मुंडे व्हायचं हा तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे.

Pankaja Munde, Pritam Munde
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार बांगरांचा ताफा वेशीवरच अडवला

तुम्ही ठामपणे ठरवलं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही का? अशी जिद्द मनात बाळगून ठेवा, तुम्ही ठरवलेल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू करा, तुम्ही निश्चितपणे यशस्वी व्हाल, असं प्रीतम मुंडे विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com