Admin
बातम्या
फडणवीसांच्या ठाकरेंवरील 'त्या' टीकेला पृथ्वीराज चव्हाणांनी केलं लाईक; चर्चा रंगल्या
महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
महाराष्ट्रात भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असल्याचा दावा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या.
भाजपा नेते मोहित कंबोज यांनी काही दिवसांपूर्वी म्हणजेच ५ एप्रिलला देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
Admin
या व्डिडिओमध्ये उद्धव ठाकरे , कोण होतास तू , काय झालास तू अरे असा कसा वाया गेलास तू असे म्हणत टीका केली होती. या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांनी लाईक केली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.