सांगलीत खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात; चार जण जागीच ठार तर एक जण जखमी
Admin

सांगलीत खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात; चार जण जागीच ठार तर एक जण जखमी

सांगलीच्या विटा- महाबळेश्वर या राज्य मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात झाला.
Published on

संजय देसाई, सांगली

सांगलीच्या विटा- महाबळेश्वर या राज्य मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारच्या भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. हे चौघेही तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील काशीद कुटुंबातील आहेत. हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला आहे. विटा पोलीस ठाण्यात अपघाताबात नोंद करण्यात आली आहे.

सकाळी विट्याकडून ट्रॅव्हल्स ही गाडी विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताराच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी सातारा कडून येणारी कार विटाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला आहे. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करीत होते. हे सर्वजण साधारणपणे ५५ वर्षाच्या पुढच्या वयाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्ती अपघातानंतर गाडीत असलेली एअर बॅग उघडलयाने बचावली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com