मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं संभाव्य वेळापत्रक जाहीर
सिनेट निवडणुकीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहेत. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका पुढल्या वर्षी एप्रिल महिन्यात होणार आहे. 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक तर 24 एप्रिलला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, असं विद्यापीठाने जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात जाहीर केला आहे. नव्याने मतदार नोंदणी आजपासून सुरू होणार आहे. ही मतदार नोंदणी पुढील एक महिना चालणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयात सिनेट निवडणुका स्थगित केल्याच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर मुंबई विद्यापीठाने सुधारित संभाव्य निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान सिनेट निवडणुकांसाठी नव्याने मतदार नोंदणी करावी लागणार आहे.
नव्या मतदार नोंदणी सुरू होत असताना याआधी मतदार नोंदणी शुल्क भरलेली यांनी पुन्हा मतदार नोंदणी शुल्क भरण्याची गरज नाही. याआधी जर मतदारांनी नाव यादीत समाविष्ट करण्यासाठी या लॉगिन आयडीद्वारे अर्ज केले असतील त्याच लॉगिन आयडीद्वारे नव्याने नोंदणी करू शकतील.
सुधारित सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक असे असणार
30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023- नोंदणीकृत पदवीधर मतदार नोंदणी अर्ज भरण्याची तारीख
1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024- मतदार नोंदणी अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी
26 फेब्रुवारी 2024 - अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार
29 फेब्रुवारी 2024 - निवडणूक अधिसूचना जाहीर करणार
11 मार्च 2024 - उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक
18 मार्च 2024- उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक
20 मार्च - उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक
21 एप्रिल 2024 - सिनेट निवडणूक पार पडणार ( सकाळी 9 ते सायंकाळी 5 )
24 एप्रिल 2024 - मतमोजणी पार पडणार