Project Cheetah
Project CheetahTeam Lokshahi

Project Cheetah : 7 दशकांनंतर भारतात 8 चित्ते दाखल!

2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता 2022 मध्ये हा 'प्रोजेक्ट चित्ता' यशस्वी होत आहे.

1952 साली भारतातून चित्ते नामशेष झाले होते. 2020 साली सर्वोच्च न्यायालयाने भारतात चित्ते आणण्याची परवानगी दिली. भारतातून चित्ते नामशेष झाल्यानंतर 1970 साली देशात चित्ते आणण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी प्रयत्न केले होते. मात्र, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी नाकारली होती. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आता 2022 मध्ये हा 'प्रोजेक्ट चित्ता' यशस्वी होत आहे.

आज भारतात नामिबियामधून आठ चित्ते दाखल झाले आहेत. विशेष विमानानं या आठ आफ्रिकन चित्त्यांना भारतात आणलं गेलं आहे. मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्क हे या चित्त्यांचं घर असणार आहे. सुमारे आठ हजार किलोमीटरचा प्रवास करुन चित्ते भारतात दाखल झाले आहेत.

Project Cheetah
"3 हजार 500 कोटी रुपये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले" सत्तारांचा दावा

चित्त्यांसाठी कसं आहे प्रयोजन?

  • नामिबियातून आणण्यात आलेल्याआठ चित्त्यांमध्ये पाच नर आणि तीन मादी आहेत.

  • नामिबियाहून विशेष विमानानं ग्वालेर, मध्य प्रदेश येथे चित्त्यांचं आगमन झालं आहे.

  • ग्वाल्हेरपासून ते कुनो नॅशनल पार्कपर्यंतचा चित्त्यांचा प्रवास हेलिकॉप्टरनं.

  • संपुर्ण प्रवासात नामिबियाच्या चित्ता संवर्धन विभागाचं (CCF) एक पथक चित्त्यांसोबत आहे.

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चित्ते कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात येतील.

  • या आठही चित्त्यांना एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे.

चित्त्यांसाठी बनवलं विशेष क्वारंटाईन सेंटर:

कुनो नॅशनल पार्क हे 748 चौरस किलोमीटरवर इतक्या मोठ्या प्रमाणावर पसरलेलं संरक्षित क्षेत्र आहे. दरम्यान, चित्त्यांना सुरूवातीचा एक महिना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कुनो नॅशनल पार्कमध्ये 12 किलोमीटर लांब कुंपण उभारून ते क्षेत्र चित्त्यांसाठी विशेष क्वारंटाईन सेंटरमध्ये रुपांतरीत केलं आहे.

Lokshahi
www.lokshahi.com