चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आम आदमी पार्टी कडून निषेध व्यक्त करत आंदोलन
Team Lokshahi

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आम आदमी पार्टी कडून निषेध व्यक्त करत आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज चौकात माफी मागा...माफी मागा चंद्रकांत पाटील माफी मागा अशा निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे.
Published by :
shweta walge

सतेज औंधकर, कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी जाहीर सभेत कोल्हापूरच्या परंपरेला ठेच पोहोचवणार आणि आई-वडिलांचा अपमान करणारे विधान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरात आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात माफी मागा...माफी मागा चंद्रकांत पाटील माफी मागा अशा निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे. वारंवार चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरची बदनामी करणारे वक्तव्य करत आहेत. अशी वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी करणं थांबवावं असा सज्जड इशारा देत आपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त करत घोषणाबाजी केली आहे. तसेच कोल्हापूरची बदनामी करणारी वादग्रस्त वक्तव्य करण थांबवाव अन्यथा त्यांना कोल्हापुरात फिरू देणार नाही. असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पार्टीच्या वतीने हातात लक्षवेधी फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला आहे.

दरम्यान आई-वडिलांना शिव्या द्या, चालेल. ते म्हणतील, जाऊ दे. आईवरुन शिव्या देणं आमच्या कोल्हापूरची पद्धत आहे. पण मोदी अमित भाईंना शिव्या देणं सहन करु शकत नाहीत, असं विधान चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या पालकमंत्री पदावर पाटील यांची निवड झाल्याने पुणे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभाच्या भाषणात बोलताना केलं आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात आम आदमी पार्टी कडून निषेध व्यक्त करत आंदोलन
वडील शिंदे गटासोबत, तर मुलाचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा; ठाकरे पिता-पुत्रामध्ये मतभेद
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com